Ad will apear here
Next
सुंदर व सत्शील दुर्गाबाई!
मराठी बोलपटाचा पहिला स्त्री चेहरा दुर्गा खोटे यांचा आज (१४ जानेवारी) जन्मदिन. त्यांच्या रूपेरी स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!

‘अयोध्येचा राजा’ या मराठी चित्रपटाबरोबर चित्रपट ‘बोलू’ लागला. या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती.

१९०५ साली जन्मलेल्या दुर्गाबाईंनी सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या.



१९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दुर्गाबाईंना गौरवण्यात आले. 

आपल्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी अनेक आघाडीच्या नायकांसमवेत आधी नायिका व मग आई, आजी अशा भूमिका केल्या व गाजवल्यासुद्धा.

२२ सप्टेंबर १९९१ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्री विजया मेहता या त्यांच्या स्नुषा.

सुंदर व आकर्षक चेहरा, उत्तम अभिनय व सत्शील वर्तन यामुळे दुर्गाबाई कायमच स्मरणात राहतील.

- भारतकुमार राऊत



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WVBDCU
Similar Posts
साम्यवादाचा जनक १९व्या व २०व्या शतकात ज्याच्या क्रांतिकारी विचारांनी अवघ्या जगाला भुरळ घातली व निम्म्या जगातील राज्यव्यवस्था पार बदलून गेली, असा साम्यवादी विचारसरणीचा उद्गाता कार्ल मार्क्स याचा आज (१३ मार्च) स्मृतिदिन!
निळा म्हणे...! महाराष्ट्राच्या संतपरंपरेने श्री ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी व गाडगेबाबांपर्यंत अनेक अनमोल मणी जोडले; पण त्यातले काही विस्मृतीत गेले. संत निळोबाराय त्यापैकीच एक. त्यांची आज (चार मार्च) पुण्यतिथी.
‘ल्युटिन्स’चा कर्ता ज्याला नवी दिल्ली शहराची थोडी फार माहिती व शहराच्या इतिहासाची जाण आहे, त्यांना ‘ल्युटिन्स’ परिसराची माहिती असतेच. प्रशस्त रस्ते, दुतर्फा शोभिवंत फुलझाडे, शोभिवंत चौक आणि परिसरात सुंदर टुमदार बंगले व प्रशस्त प्रशासकीय इमारती हे सारे वैभव ही भारताच्या राजधानीची शान आहे. हा भाग ज्यांनी वसवला ते कल्पक वास्तुकार एडविन ल्युटिन्स
कीर्तनविद्येचा कलाकार! सुप्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचा आज (पाच फेब्रुवारी) वाढदिवस! त्यांना लाख लाख शुभेच्छा!

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language